कोणासाठी रुसावे
कोणासाठी रुसावे
शब्द शेवटचे तुझे
पापनितला थेंब गालावर उतरे
आठवणींच्या विश्वात असेल तु घेरली
क्षण गोळा करताना रात्र असेल सरली
पहाटवेळी मन का झाले कापरे
काहुरली हृदयात स्वासांची पाखरे
लिहिता हे शब्द थरथर अंतरी पसरे
कोणासाठी रुसावे असे होऊनी उपरे