कोण माझा तू
कोण माझा तू
इतके प्रेम केले तुझ्यावर
काय तू किंमत केलीस ?
शेवटी कोण आहेस माझा तू
कधी वागतोस वेड्यासारखा ..
कधी पळतोस दूर माझ्यापासून
जवळ असूनही दूर भासे
पण माझ्या जवळ तू आहे
मी खूप प्रेम केले तुझ्यावर
प्रेम व्यक्त केले कवितांमध्ये
तुला कधी मी शब्दात गुंफले..
दडवले कधी भावनांच्या शिंपल्यात
तू मला हवा आहेस
का कळत नाही तुला