कोण होता ?
कोण होता ?
आई तो कोण होता ग ज्याने माझी अशी अब्रु लुटली
आणि माझे जीवन उध्वस्त केले
आई तो कोण होता ग ज्याने माझ्या चेहऱ्यावर अँसिड फेकले
आणि माझे सौंदर्य हिरावून घेतले
आई तो कोण होता ग पिऊन बेफाम गाडी चालवत होता
भर रस्त्यात मला उडवून गेला
आई तो कोण होता ग ज्याने पायाखाली मला इतके तुडवले
आता माणुसकी उरली नाही ग
आई तो कोण होता ग ज्याने शहरात असा घातपात केला
आणि इतक्या लोकांचे जीवन संपवले
आई तो कोण होता ग ज्याला मी इतकी नकोशी झाली
त्यांनी मला कचऱ्याच्या कुंडीत टाकले
इतकी मी समाजाला नको आहे
तुच खरखर सांग मला आई आई तो कोण होता ग
