कॉलेजातले प्रेम
कॉलेजातले प्रेम
कॉलेज शिकण्या
टाकले पाऊल
हृदयी उगाच
कसली चाहूल
सुगंधी क्षणांनी
हुरहूर वाटे
मनीचे काहूर
काळजात दाटे
मिळाली नजर
क्षणात दोघांची
भाव ओळखले
संधी मिलनाची
हवासा एकांत
धुंद करी मला
नको दूर जाऊ
भेट सांजच्याला
भेटीसाठी मन
आसुसले आज
पहिलेच प्रेम
की मनीची लाज

