STORYMIRROR

Pratibha Vibhute

Classics

4  

Pratibha Vibhute

Classics

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
611

शरदाचे चांदणे सजले

नभांगणी सुंदर नक्षीदार

गोलमटोर चंद्रमा मध्येच

दिसतो कसा बहारदार


रत्नाकर असे आज शांत

चंद्रमाचे प्रतिबिंब पडते

दुधाळ लाटा येता किनारी

लुकलुक प्रतिबिंब हलते


नभांगणी सुंदर नजारा

निसर्गाचा हिरवाई साज

चंद्र, चांदण्याची मैफिल

रंगली कोजागिरी आज


पौष्टिक केशरी,सुकामेवा

घालून दुध तयार करू

चंद्राची शीतल पडे छाया

औषधीगुण नि माधुर्य भरू


मित्र, मैत्रीणी ,नातलगासह 

गप्पागोष्टी करूया जागरण

कोजागर्ती म्हणतं येई लक्ष्मी

जागे असे त्यास देई वर नि धन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics