कल्पना
कल्पना
सागराच्या किनारी मी बसावे
वाळूवर चित्र तुझे ही कोरावे
बोटांनी आकार मी रेखाटावे
चित्र लाटांनी मिटवूनी न्यावे
पाणी खारट मी जरा चखावे
मऊ वाळूवर झोपूनी राहावे
झोपेत तुझे स्वप्न मीही बघावे
स्पर्श करिता सागर ही म्हणावे
शिंपल्यातले मोती मी काढावे
माळ तुझ्यासाठी घेऊन यावे
मिठीत सागराच्या मीही जावे
निसर्ग सुंदर तुलाही आणावे
गार वारा हिरवे झाडे निहारावे
फुलांचा गंध मी तुला सुंगवावे
डोंगरावर उभा मी सागर प्यावे
ओंजळ पाण्याची तुला आणावे

