STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

4  

vaishali vartak

Romance Others

कल्पना पूर्ती

कल्पना पूर्ती

1 min
395

आतुरलेली तप्त अवनी

येता पावसाच्या सरी

तृप्त होऊनी प्याली जल 

 मृदगंध दरवळे क्षणभरी


आला आला पाऊस आला

निळे अथांग चोहीकडे पाणी 

वर्षा धारेची वरून बरसात

आला विचार मनी गाऊया प्रीत गाणी


 वाटे मज झेलू थेंब पावसाचे

करुया नौका विहार मजेत

लुटूया आनंद पहिल्या पावसाचा

किती मजेचे क्षण आलेत


मनात येता विचार 

बोलविले मी सख्याला

हसत दिला होकार त्याने

निघालो नौका विहाराला


 लाल नौका लाल छत्री 

फुले नावेत फुललेली सुंदर 

दोघे बसलो एटीत नावेत 

जन बघती दृश्य मनोहर


आला बघ तो दिसे पैलतीर

थांबेल आता तो पाऊस

कागदाचीच ती होती नौका

कल्पनेतील पूर्ण झाली हौस



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance