कळेल.
कळेल.
कळेल तुझं दुःख
जर भेटलीस मला तू
देईल तुला सुखं
जर दिसलीस पीला तू
मैत्री माझी निखळ
नको असे मला टाळू
मनातुन चाहतो सखे
सांग तुला कसे भेटू
मनातलं सखे तुझ्या
जाणीलं गं कधीच मी
सांगावं वाटतं तुला
पण अडलो आधीच मी
कसा सांगू मनातलं तुझ्या
मला कळंनाच काही
भाव तुझ्या मनातले
मला मिळालेच नाही
दुःख तुझं सखे मला
वाटतं वाटून घ्यावं
हसवावे तुला नेहमी
माझ्यातलं सुख तुलाच द्यावं
जर वाटलंच कधी तुला
माझ्या वेड्या मिठीत यावं
तर तुझ्यासवे राणी मी
आनंदात हरपून जावं
साद तुला घातली प्रेमाची
तूच ठरव काय तुला करायचं
मला फक्त तुझ्यात रंगुन सखे
रानं पाखरांगत फिरायच
