STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

3  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

खोटे प्रेम

खोटे प्रेम

1 min
933

खोट्या प्रेमाचे आमिष दाखवून

लुटू नको ग प्रियकराला  


आभास प्रेमाचा तू ग दाखवून 

भुलवू नको ग त्याला  


एकनिष्ठ तू कधी न दिसली  

अनेकांसोबत फिरताना सापडली 


प्रत्येकास तू खोटे बोलली 

काळजांच्या त्याच्या तू लय लूट केली  


मनात आले तेव्हा अचानक सोडून गेली 

अशी कशी ग प्रीत तुझी जगावेगळी निघाली


काळजाला तू त्याच्या दुःख देऊन गेली  

मनाला त्याच्या ग दुःख देऊन गेली


तरी ही त्याचे प्रेम वेडे ग तुलाच शोधत राही  

रात्रं दिवस तुझ्या आठवणी सदा स्मरत राही 


तुझ्यासाठी तो रात्रं दिवस अन्नास मुकला बाई 

त्याच्या प्रेमाची तुजला कीव का येत नाही  ?


त्याच्या जगण्याची तुला कदर कशी का येत नाही?

काय त्याने गुन्हा ग केला विश्वास तुझ्यावर अर्पिला  


एक एक शब्द देऊन तुला सखे वचनबद्ध राहिला

तुझ्यासाठी ग तो सारखा सारखा झुरतच राहिला  


तुझ्या खोट्या प्रेमाने बाई त्याला वेडापिसा केला  

आयुष्यभर चिंतेने तो अखेरीस चितेकडे गेला


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy