STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

3  

Shobha Wagle

Tragedy

खेळ नियतीचा

खेळ नियतीचा

1 min
389

नियतीचा खेळ चालला

मृत्युचे थैमान सगळीकडे

हृदयाची धडधड सारखी

उदाशी वातावरण चौहीकडे.


रोज येते दुःखद बातम्या

नको वाटते ऐकणे आता

देवा थांबव हा रोग पसारा

कळकळीची विनविते माता.


जवळचा माणूस दूर जातो

अश्रू सुद्धा सुकून जातात

वादळाचे काहूर मनात दाटते

रात्रभर उश्या चिंब भिजतात.


कुणाचा जरी माणूस गेला

तरी चित्र डोळ्यात साठते

आपल्या गेलेल्या माणसाचे

अन् दुःख आठवुनी मी रडते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy