केली पण प्रीती
केली पण प्रीती
जरी फक्त होती,
अशारिर नाती
मनोमन तू मी,
केली पण प्रीती !!
जरी दाट होती,
मनातून भीती
धैर्याने दोघांनी,
केली पण प्रीती !!
उभारल्या भिंती,
दाखवली भीती
झुगारून सारे,
केली पण प्रीती !!
प्रज्वलित केली,
प्रेमरूपी ज्योती
घेत हात हाती,
केली पण प्रीती !!

