कधीतरी केव्हातरी..
कधीतरी केव्हातरी..
कधीतरी केव्हातरी असंच वाटायचं की..
आपलंही कुणीतरी असावं,
ऑफिसहुन आल्यावर जवळ कुणीतरी बसावं,
कधीतरी उगीच खोट खोटं रुसावं.
कधीतरी केव्हातरी असंच वाटायचं की..
आपल्याला ही मिळेल का मनासारखी परी,
विचारेल 'चहा घेता का?' आल्यावर घरी,
'Office मधलं सगळं tension जाईल का आपलं' पाहून तिला दारी.
कधीतरी केव्हातरी असंच वाटायचं की..
Gallery मध्ये हातात हात घेऊन कॉफी घेईल का कोणी,
निःस्वार्थ प्रेम करणारी भेटेल का प्रेमदिवाणी,
व्यवहार ज्ञान असावे थोडी असावी शहाणी,
उच्च असावेत विचार, साधी असावी राहणी,
चेहऱ्यावर हसू आणि ओठांवर गाणी.
कधीतरी केव्हातरी असंच वाटायचं की..
विचारावं कुणीतरी आपल्यालाही आज जेवायला काय करू,
आज पगार झाला चला आपण किराणा सामान भरू.
कधीतरी केव्हातरी असंच वाटायचं की..
असावी कोणीतरी जी म्हणेल फिरायला जाऊ,
हातात हात घेऊन सिनेमाची गाणी गाऊ,
नंतर पाण्यात पाय बुडवून एकमेकांच्या डोळ्यात मनसोक्त पाहू.
कधीतरी केव्हातरी असंच वाटायचं की..
असावं कोणीतरी आईला मदत करायला,
तिच्या आकाशला तिच्या एवढंच जीव लावायला,
घरासमोर दिवाळीला रांगोळी काढायला,
आईनं करावा स्वयंपाक अन ती असावी वाढायला.
आत्ता असं वाटतंय की,
होतील आपल्याही सगळ्या इच्छा पूर्ण,
आपल्याही अंगातल्या होतील अधिकच्या caleries बर्न.

