STORYMIRROR

Raakesh More

Romance Others

3  

Raakesh More

Romance Others

कधीतरी जीवन माझं

कधीतरी जीवन माझं

1 min
12K

कधीतरी जीवन माझं 

येऊन तू सावरशील 

भावनांच्या सुसाट माझ्या 

प्रवाहाला आवरशील ||0||


विसावा देशील या 

तडफडणाऱ्या जीवाला 

ओंजळीत जपशील 

फडफडणाऱ्या दिव्याला 

उत्तुंग प्रेमशिखर पाहून 

तुही कावरशील 

भावनांच्या सुसाट माझ्या 

प्रवाहाला आवरशील ||1||


काय माहित आहे तुला 

किती प्रेम करतोय 

हृदयाला मिठीत आता 

घट्ट मी धरतोय 

अस्वस्थ हृदय पाहून 

तुही बावरशील 

भावनांच्या सुसाट माझ्या 

प्रवाहाला आवरशील ||2||


अस्तव्यस्त जीवन 

तुझ्याविना झालंय 

तुटल्यासारखा झालोय 

अवसान गाळालंय 

विरहाच्या यातनेला तू 

नक्की ना करशील 

भावनांच्या सुसाट माझ्या 

प्रवाहाला आवरशील ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance