STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

3  

Umakant Kale

Tragedy

काय सांगू गड्या !

काय सांगू गड्या !

1 min
317

काय सांगू तुला गड्या 

या म्हातारीची कहाणी ..

नाही उरले आता रे

माझ्या या डोळ्यात पाणी...


जुनी लोक होती म्हणे

नाही राहणार कुणी..

कलयुगी सारे स्वार्थी

काय माझे, काय परके कुणी ?


दोन घडी बोलायला

नाही सवड रे कुणाला ?

नाही उरली ती माया 

देऊ दोष मी कुणाला ?


तुला तरी कळली रे

भावनांची ही उधारी...

येऊ बसला तुच रे

विचारायला शेजारी...


म्हणून बा आता तुला

हे मी सांगते तरी...

सांगून गेले थोर कुणी

माणसापरीच मेंढरं बरी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy