काव्य म्हणी
काव्य म्हणी
अंगात गुणांचे सदा वावडे
जणू बुद्धीचे निघती तोकडे
इतभर चुलीत हातभर लाकडे
नाचता येईना अंगण वाकडे ||१||
पेरले ते उगवते यावरी जग चालते
सतकार्याच्या कार्याने पुण्य लाभते
कळते पण वळत नाही अन् म्हणते
दिसते तसे नसते म्हणून जग फसते||२||
मुलगी शिकली प्रगती झाली
कायम रूढीत बांधली गेलेली
शिक्षणापासून वंचित राहिल्या मुली
अन् घरोघरी असती मातीच्या चुली ||३||
अतिरेक मातीमोल हेच सांगते
स्वकष्टाने योग्य निर्णय स्वतः घेते
ऐकावे जनाचे करावे मनाचे
गर्वाचे घर कायम खालीच असते ||४||
धावपळीच्या जगात नवीन काही शिकतो
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो
काही चुकत असल्यास कान पकडून चुका सुधारतो
शेवटी गोगलगाय अन् पोटात पाय होतो ||५||
