STORYMIRROR

Shivam Madrewar

Inspirational Others

4  

Shivam Madrewar

Inspirational Others

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.

1 min
226

नाही कधीही तो पहाटे उजाडतो,

ना ही सायंकाळी घरी तो परततो,

ना ही त्याने मानली आजपर्यंत हार, 

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.


घडते त्याच्यामुळे पुर्ण ही सृष्टी,

त्याच्यामुळेच मिळाली प्रत्येकाला दृष्टी,

अजुनही वाट पाहतात दिशा चार,

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.


कायम दिसतो तो आकाशात तो नारंगी,

त्याच्याशिवाय प्रत्येकाचे जीवन आहे बेरंगी,

करतो तो प्रत्येक चित्रकाराच्या मनात वार,

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.


भरदुपारी आगी सारखा तापतो तो रवी,

त्याच्यावरतीच भास्य करतोय हा कवी,

करतो तो प्रत्येक ठिकाणी चमत्कार,

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.


नाही लागत त्यास राज्यासाठी दरबार,

स्वत: काम करून पिकवतो तो शिवार,

शेतकरी देखील आहे त्याचा एक परिवार,

कारण, सुर्य आहे एक महान कलाकार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational