काळ
काळ
काळाला पाहताना
करावा असा *नमस्कार,*
नाहीतर वेळेला
दाखवा खरा *चमत्कार.*
काळानुसार तुम्ही
आता बदलून *पहावं,*
वेळेचं भान सांगे
काहितरी तुम्ही *करावं.*
काळाच्या ओघातही
अनेक चुका *घडतात,*
वेळेत सुधारल्या
तर माफ साऱ्या *होतात.*
काळ कोणाचा असो
चूक संकटात *घडते,*
वेळ कोणाची असो
ती सावरायची *असते.*
काळाच्या प्रवाहात
सारेच वाहून *जातात,*
वेळ न सावरता
बरेच बाजू *मारतात.*