Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajendra Vaidya

Tragedy Inspirational

3  

Rajendra Vaidya

Tragedy Inspirational

काल उद्याचा कठीण आहे

काल उद्याचा कठीण आहे

1 min
12.3K


बचत करा रे बचत करा

काल उद्याचा कठीण आहे

साठवलेले धन केव्हाही

कामी आपुल्या येणार आहे ...(१)


काल उद्याचा कठीण आहे

तोंडमिळवणी परीक्षा आहे

मध्यम वर्गासाठी केवळ

दमडी दमडी आधार आहे ...(२)


मजेत हसतील ते उद्योजक

शेतकरीही झाले पुलकित

लाख कोटींची दिली खिरापत

कर्ज फेडणे मुश्किल आहे ...(३)


महामारी पृथ्वी घेरीली

अर्थव्यवस्था होय खिळखिळी

घेतली सारे लुटूनी ग्राहका

उपासमारी आपुली आहे ...(४)


गाठीस बांधा पैसे चार

निभाव लागेल थोडा फार

डबघाईला आला बाजार

धनसंचय ही शक्ती आहे ...(५)


कुणास ठावे घडेल काय?

रोग काढता घेत न पाय

खिसा रिकामा होईल आपुला

दाम दुपटीने देणे आहे ...(६)


बचत करा रे बचत करा

काल उद्याचा कठीण आहे...


Rate this content
Log in