STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Inspirational Thriller

3  

Rohit Khamkar

Fantasy Inspirational Thriller

काहीतरी राहिलंय....

काहीतरी राहिलंय....

1 min
204

प्रत्येक क्षणाला असं वाटतंय, सारं काही केलंय.

पण शांतपणे विचार केला की, समजतं, काहीतरी राहिलंय.


जे साऱ्यांनी पाहिलंय, ते पण मी पाहिलंय,

उगाच हिशोब लावतो मी, किती काही गेलंय.

नंतर येतो अहंकार, कितीतरी मी सोडलंय.

पण शांतपणे विचार केला की, समजतं, काहीतरी राहिलंय.


लांब उभा काळोखात, तरी दिसतंय काही तरी पेटलंय.

काम भारी पुढारी, दुसऱ्याच्या लग्नात नटलंय.

दिसतं सगळं चांगल, पण खूप ठिकाणी फाटलंय.

पण शांतपणे विचार केला की, समजतं, काहीतरी राहिलंय.


कित्येक असतील माझ्यासारखी, स्वतः मी पाहिलंय.

कधी कधी परिस्तिथी समोर, स्वप्न मी वाहिलंय.

अन्यायाची गिनती नाही, एवढं मी सोसलंय.

पण शांतपणे विचार केला की, समजतं, काहीतरी राहिलंय.


नशिबानं नव्हता विचार केला, ते सुद्धा दावलंय.

कधी कधी नशीब सुद्धा, तुक्या वर पावलंय.

शेवटी स्वप्नांच्या प्रयत्ना साठी, आयुष्य हे गावलंय.

पण शांतपणे विचार केला की, समजतं, काहीतरी राहिलंय.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy