काहीतरी हरवलंय
काहीतरी हरवलंय
काहीतरी हरवलंय
जगण्याच्या श्वासामध्ये
सूर हलले जीवनाचे
जगण्याच्या ध्यासामध्ये
काही तरी हरवलंय
बालपणाच्या आठवणीत
जो काळ होता जपला
ह्रदयातील साठवणीत
काही तरी हरवलंय
शब्द-सूर ओघळले
नाती जपतांना अपुली
मन कितीदा होरपळले
काही तरी हरवलंय
प्रेम प्रेमासठी आसुसले
खूप जास्त जपतांना
प्रेम प्रेमाशीच रूसले
काही तरी हरवलंय
कळेना शोधू त्यास कसे?
काट्यांच्या ताटव्यात माझा
गुलाब ना जाणे केव्हा हसे?
