STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

काही बोलायाचे आहे.....

काही बोलायाचे आहे.....

1 min
14K


अजून येई ना ओठांवर

माझ्या मनातली प्रीत

कसे करावे सखी हितगूज ?

कधी येईल ओठी प्रेमगीत ?


तू समोर दिसलीस की

धडधडतो माझा जीव

मनातले बोलणे मनातच अडते

जरा तरी करावी तू कीव


हे हृदयरागिणी, हे प्राणप्रिया

मला काही बोलायाचे हे

मीच तुझा हृदयराजा, प्राणनाथ

माझे हृदय खोलायाचे आहे


आता होईना सहन

तुझा - माझा हा दुरावा

प्रेम माझे तूच आहे

मागू नकोस गं पुरावा


धुंद वेडे मन बोले

प्रेमाची सारी कहाणी

एकमेकांच्या सोबत दोघे

मी राजा, तू माझी राणी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance