STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Inspirational

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Inspirational

ज्वालामुखी

ज्वालामुखी

1 min
357

ज्वालामुखी युगांचा सारा मनात आहे

बेफाम वादळांचा मारा मनात आहे


सूर्यास्त आज झाला समजू नकोस माझा

तेजात खेळणारा तारा मनात आहे


खेळात हार माझी झाली अजून नाही

हारून जिंकण्याचा नारा मनात आहे


सारे उन्हात माझे आयुष्य पेटलेले

खडकात वाहणारी धारा मनात आहे


समजू नकोस शांती होती भयाण माझी

थंडी तुफान गारा वारा मनात आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy