STORYMIRROR

yuvaraj jagtap

Action Tragedy

3  

yuvaraj jagtap

Action Tragedy

जपून टाक पाऊल पोरी

जपून टाक पाऊल पोरी

1 min
14.6K


तारुण्य आलं

तुझ्या दारी

जपून टाक

पाऊल पोरी

कपड्यात दाटलं

तुझं अंग अंग

समाज नजारांचा

विचित्र रंग

तारुण्याचा बहर

तुज नसा नसात

कुत्री मागं मागं

तुझ्याच वासात

ठेऊच नकोस

उघडे अंग

घालूच नकोस

कपडे तंग

वासनेच्या नजरा

अंगावर खिळतील

श्वापदी लांडगे

पदोपदी भेटतील

वेळीच ओळख

वासनांध नजरा

दूर लोट

स्वभाव बुजरा

वासने पोटी 

लावतील लळा

शिकार करून

चिरतील गळा

अंग पूर्ण

तुझं झाक

नाहीतर होईल

तारुण्याची राख

लालसेला कोणाच्या

नकोस पडू बळी

स्पर्शिले कोणी

लागावं कानठाळी

स्वरक्षणाचा तूच

उचल भार

जवळ ठेव 

सदैव हत्यार




Rate this content
Log in

Similar marathi poem from Action