जंगलातली सभा
जंगलातली सभा
जंगलात एकदा भरली सभा
अध्यक्ष म्हणून सिंहराजा उभा //१//
हत्तीदादा आला झुलवत सोंड
माकडाने केले वाकडे तोंड //2//
सभेला सुरुवात केली वाघाने
मध्येच घोळ घातला लांडग्यांने //3//
विषय मांडला कोल्ह्याने
विरोध केला अस्वलाने //4//
सभेचा झाला भलताच खोटा
सगळ्यांनी धरल्या घरच्या वाटा //5//
