जळत रहाते संवेदना
जळत रहाते संवेदना
कष्ट होता ते जीवास
होई भावनिक वेदना
दुःख होते काळजात
*जळत रहाते संवेदना*
शब्द , कटू ते ऐकता
मन होतसे उदास
मन असे संवेदनाशील
भाव कष्टी करी मनास
होते वेदना प्राणी मात्रास ही
दिसते ती निसर्गात
उगा का लक्ष घारीचे
संवेदनेने लक्ष उडता पिल्लात
करी संवेदना घर मनात
ठसठसते सदा जीवाला
थोडीशी पीडा होताची
कळ येई शरीराला
परी काही वेदना अशा
देता माता जन्म बालकास
विसरते ती त्या संवेदनांना
आनंदते पाहताच तान्हुल्यास
