जखमा ओल्या
जखमा ओल्या
ओल्या जखमा
आठवणींच्या बांधलेल्या,
गाठी ढिल्या झाल्या.
आज आसवांनी माझ्या,
जखमा ओल्या झाल्या.
तु येशील या आशेवर,
आजवर तश्याच ठेवल्या.
चिठ्ठ्या ज्या आजवर,
मी,तुला लिहिलेल्या.
आज आसवांनी माझ्या,
जखमा ओल्या झाल्या.
किती प्रयास केला,
किती प्रतीक्षा केल्या.
जोडण्याच्या वोघात ह्या,
वाटा वेगळ्या झाल्या.
आज आसवांनी माझ्या,
जखमा ओल्या झाल्या.
जर,काहिच नाही तर,
मग ह्या बातम्या कसल्या.
चर्चा माझ्या प्रेमाच्या,
का चोहीकडे ह्या झाल्या.
आज आसवांनी माझ्या,
जखमा ओल्या झाल्या.
आज आसवांनी माझ्या,
जखमा ओल्या झाल्या
