जखम
जखम


एक जखम काळजात रुतलेली
आज पुन्हा बहरली कशी
जखमेची खपली निघाली
पुन्हा नव्याने भळभळली अशी
तुला पाहता समोर अचानक
भावना उचंबळल्या पुन्हा नव्याने
माझ्या मनीच्या खोल डोहात
तरंग उमटले पुन्हा जोमाने
आठवणींच्या खोल गर्तेत
मळभ दाटून घोंघावे वारा
विजेसारखा तो प्रखर आघात
निश्चल जणू देह सारा
काहूर मनीचे डोळ्यात साठलेले
वाहण्याला त्या थांबवू कशी
उधाणलेल्या सागरातील नौका
आज पुन्हा सावरू कशी...