जिजाऊ
जिजाऊ
12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड नगरीत घटना घडली मोठी
जन्म झाला तुझा आई म्हाळसाबाई आणि वडील लखुजी जाधव यांच्या पोटी
राजमाता जिजाऊ म्हणजे स्वातंत्र्याची पहिली पहाट
जिनेे दाखवली हिंदवी स्वराज्याची शिवबाला वाट
राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारात घडले छत्रपती
नव्हती त्यांच्याकडे कोणतीही भ्रांंती
जेंव्हा आणलं छत्रपती समोर सुभेदाराची सून
तेंव्हा वदले छत्रपती 'अशीच असती आमची माता सुंदर,
आम्हीही झालो असतो सुंंदर' तिला पाहून
भरली तिची ओटी देऊन बांगडी आणि चोळी
हीच आहे मां जिजाऊंच्या संस्कारांची मोळी
मां जिजाऊंंचं होतंं रयतेवर प्रेम अतोनात
नाही होऊ दिली त्यांनी त्यांची वाताहत
केल्या प्रत्येक परिस्थितीवर मात
देऊनी एकमेकां हात
होता त्यांचा साहसी स्वभाव
म्हणून तर शिवरायांना दिला त्यांनी वाव
शिवबाला तुम्हीच शिकवला न्यायनिवाडा
तुमचा होता आगळावेगळा स्वराज्य आखाडा
निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही तुम्हा पुढेे घातले लोटांगण
खरीच खूप मोठी होती तुमची शिकवण
तुम्हीच शिकवले दुःख स्वतः पचवावे
सुख दुसऱ्यासाठी उधळत रहावे
नाही पाहिला कधी कुणाचा तुम्ही धर्म
बनवला मावळा फक्त पाहूनी कर्म
