STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

3  

Jyoti gosavi

Romance

जीवनातले नवरंग

जीवनातले नवरंग

1 min
248

या रंगपंचमीला म्हणतो सखे

 भेट देईन हिरवा रेशीम चुडा 

 पाठवीन मी तुझ्या घरी 

शुभ्र साखरेचा पुडा


 गुलाब फूलतील गालावरती

 लज्जेचे अन प्रेमाचे

 अंजिरी रंगाच्या पैठणी वरती

 मोर नाचतील सौख्याचे


 निळा रंगाचा लेवून शालू

 लग्नाला तू उभी राहशील

 सावरीत मोरपिशी शेला

 मजकडे हळूच चोरून पाहशील 


मामा घेईल पिवळी साडी

 वरातीस लाल मारुती गाडी

 माहेरच्या विरहाची झालर थोडी

 दिसेल शोभून आपली जोडी


 पायामध्ये जोडवी, पैंजणी

 कंठा मध्ये कृष्ण मणी

 घेऊनी सुखाची पर्वणी

 जीवनात येशील तू साजणी


 नवरंगाची सारी उधळण

 करूया आपुल्या जीवनी

 संसाराचा हाकू गाडा 

 मी राजा अन् तू राणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance