STORYMIRROR

Nimisha Narvekar

Inspirational

3  

Nimisha Narvekar

Inspirational

जीवनाची वाटचाल

जीवनाची वाटचाल

1 min
182

खडतर आहे हा प्रवास

सोप्पा नाही हा मार्ग;

भलेभले डगमगले

गेले हे जग सोडून

आयुष्याला घुटमळून


वाटेत भेटेल अनेक शत्रू

घेऊन मुखवटा मित्राचा,

पण तू जाणं खरे हे सत्य

कोण नाही तुला मित्र स्वतः सारखा


करोनी प्रशंसा तुझी

बोले तुझ्या मुखावरी

पसरवूनी निंदा तुझी तेच

सांगे सर्वांच्या कानावरी !


हेच सत्य जीवनाचे तू

जाण स्वतःहून,

कोण नाही सांगणार

तुला आपणहून !


नको रडत बसू एकटा

तू भिंतीच्या कोपऱ्याल्या,

चल उठ मार्गस्थ हो

जीवनातल्या तुझ्या प्रगतीपथाला !!


जीवनातले निराशेचे ढग जेव्हा

तू दूर सारशिल, तेव्हाच मित्रा

नव्या उमेदीचे पहाट तू

चिंतामुक्त होऊन पाहशील !..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational