STORYMIRROR

Nimisha Narvekar

Others

3  

Nimisha Narvekar

Others

माझी मराठी भाषा

माझी मराठी भाषा

1 min
192

माझ्या मराठी भाषेची

आहे मला जाणं...

तिचा कधीही मी होऊ

देणारं नाही अवमानं...


माझ्या मराठी भाषेची

आहे मला गोडवी...

काना -कोपऱ्यात जगाच्या 

पोहचवीन तिची थोरवी...


धन्य आहे मी खरी

मराठी मला लाभली... 

धन्य आहे मी खरी

महाराष्ट्रात मी जन्मली...


आहे माझी मराठी,

प्रत्येकाच्या श्वासात...

ती आहे जणू ,जीवनाच्या

प्रत्येक ध्यासात...


लेखकाच्या लेखणीतून प्रकटते ती

आईच्या मायेतून ओझरते ती...


मराठीची कीर्ती आहेच अशी महान 

भले - भले गातात तिचे गुणगान...


परकीय भाषा जरी असतील 

भविष्याचा गरजा...

तरी कमी होऊ देऊ नका 

माझ्या मराठी भाषेचा दर्जा...


होते माझ्या मराठीचे कौतुक

संतांच्या वाणी- वाणीतून...

होतो तिच्या विविध रूपांचा जाण 

प्रत्येकाच्या बोली - बोलीतून... 


राष्ट्रा - राष्ट्रात ठेवा तिची जागृती 

शाळे - शाळेत असुद्या तिची स्वीकृती...


ओढ असे मनात तिचा

अभंगा- रुपी...

वेग असे दळणात तिचा

ओवी- स्वरुपी...


शूरवीरांच्या रक्तातून वाहते ती

गायकाच्या कंठातून सूर धरीते ती...


असू दे असाच तिचा वावर मुखात

असू दे असाच तिचा जागर जगात...       


Rate this content
Log in