उद्याचा दिवस
उद्याचा दिवस
1 min
196
असे मनी सतत विचार
उद्याचा दिवस नक्की कसा असणार ?
प्रत्येकजण ठेवी अशी मनात आस,
उद्याचा दिवस जावा सर्वांचा खास...
घटना साऱ्या एक एक आपण
मनी रंगवितो, पण...
दुसऱ्या दिवशी खरे तर काही
वेगळेच क्षण अनुभवीतो !..
डोक्यात सतत असे अपुल्या विचारांचे वारे
उद्याचा दिवस कसा जाईल,
मित्रा तू तरी सांग ना रे !...
शेवटी विचार करून मी थकलो
माझे मलाच कळले नाही,
डोळे मिटून कधी मी निजलो...
रात्र सरली दिवस उगवला
सोनकिरणांनी , आकाश सारा रंगवला...
खांद्यावर ओझे, पायात चपला
चला अनुभवू दिवस आजचा आपला...
