STORYMIRROR

Nimisha Narvekar

Others

3  

Nimisha Narvekar

Others

नात्यांची व्याख्या

नात्यांची व्याख्या

1 min
198

काही नाती असतात आपुलकीची; 

तर काही असतात औपचारिकतेची !


काही नाती असतात क्षणभरांची; 

तर काही असतात आयुष्यभराची !


काही नाती असतात रक्ताची; 

तर काही असतात रक्ताच्या पलीकडची !


काहींची नाळ असते जुळलेली अतूट मैत्रीची

तर काहींची नाळ असते जुळलेली अतूट प्रेमाची !


काहींना ‍असते गरज समाजाच्या जात पुराव्यांची; 

तर काहींना नसते गरज कोणत्याही प्रमाणांची !


व्याख्या नात्यांची जरी असली आगळीवेगळी प्रत्येकाची

गरज आहे ती फक्त एकमेकांना ओळखून घेण्याची


Rate this content
Log in