STORYMIRROR

Nimisha Narvekar

Others

3  

Nimisha Narvekar

Others

एकटेपणा

एकटेपणा

1 min
140

हसऱ्या चेहऱ्यामागील दडलेले

दुःख जाणिले ना कुणी...


पाणावलेल्या डोळ्यातील ओघळलेले

अश्रू पाहिले ना कुणी...


सांत्वन मनाचं करायला आपलेपणाने

जवळ कोणी बोलावलं नाही...


दोन गोष्टी गमतीच्या मोकळेपणाने

बोलायला जवळ कोणी आलं नाही...


त्या गर्दीत मी एकटेपणा अनुभवते

हे कोणाला जाणवलं नाही...


'चल खेळूया सोबत' असं हक्काने

मला कोणी बोलावलं नाही...


आपण आपल्यामध्ये ही आनंदी

असू शकतो हे मी जाणिले नाही...


एकटेपणाच्या या विश्वात माझा मी

स्वतःला वेळ असा कधी दिला नाही...


आता माणसांच्या गर्दीत "स्व" शिवाय

मी दुसऱ्या गोष्टीला महत्व दिलं नाही...


आता अपेक्षांच्या विश्वात मी खऱ्या अर्थाने

निराशेला मनात घर करू दिलं नाही !!..


Rate this content
Log in