जीवन
जीवन
श्वासांचे अनपेक्षित भार
त्यास जीवन ऐसे नाव,
जन्मापासून मृत्यूपर्यंत
अनोळखी असे गाव...
क्षणिक सारे हे बहाणे
सुख-दु:ख येणे-जाणे,
जीवनाच्या प्रवासात
घाव अंतरीचे सांभाळणे....
जीवन म्हणजे एक लपंडाव
अतपासून ते इथपर्यंतचा,
या अस्तित्वाचा एक झंकार
शेवटच्या क्षणापर्यंतचा.....
असो कसेही परी देऊ
संगीत त्यास हक्काचे,
जगू असे मनसोक्त
क्षण सारेच जीवनाचे....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷