जीवन म्हणजे
जीवन म्हणजे
जीवन म्हणजे
जन्म मृत्यूमधली दुआ
जीवन म्हणजे जीवन नाही
तर त्यासाठी संघर्ष हवा
जीवन म्हणजे
जीवन असावे
नकोत नुसती अशांती
तिथे असावी क्रांती
नकोत नुसती भटकंती
जीवन हे सूर्यासारखे
तळपते असावे
जीवन हे चंद्रासारखे
शीतल असावे
त्यात कधी सुख असावे
अन क्षणिक दुःखही असावे
जीवन हे असे जागा
कि जगल्यासारखे
वाटले पाहिजे
मरण हे असे जागा
कि मेले तरी पुरून
उरले पाहिजे
जीवन हे असे आसवे
जन्म झाल्यासारखे
जीवन म्हणजे आयुष्य
जीवन म्हणजे भविष्य
जीवन म्हणजे
जगण्याचा भूतही
जीवन हे असे जगावे
कधी स्वतःसाठी तर
कधी दुसऱ्यासाठी जगावे
जीवन म्हणजे जीवन नसावे
त्यात असावी मेहनत चिकाटी
अन क्षितिजा पलीकडे जाण्याची
मोठी जिद्द असावी
जगण्याची आशा समोर असेल
मनात मोठी जिद्द असेल
कितीही अडथळे येवो वाटेवरती
याला सारण्याची
ताकत येते हत्तीसारखी
जीवन हे असे जगावे
जीवन साकार झाले
वाटले पाहिजे
जीवन हे असे निर्भीड जगावे
मेले तरी पुरून उरले पाहिजे
