शब्दाचे बहाणे किती झाले
शब्दाचे बहाणे किती झाले
कधी करावेसे काही
कधी सोडून देणे झाले
वेड्या मनाचे असे
बहाणे किती झाले
काळोखात चांदण्याचे,
लखलखते तेज आले,
अर्धी रात्र मनाला
काय सहन किती झाले
वेड्या अश्या मनाचे
दडलेले शब्द ओले
व्याकुळले शब्द काही
काही अजून भ्याले
जखमेची वेदना ही
शब्द चिघळते झाले
किती लावले लेप काही,
पण जखमेत लिप्त झाले
किती लागल्या शब्दच्या,
बोटातही अनेक ठेचा,
वाहले रक्त काही,
काही शब्दात भेगा
जखमेत किती ते
शब्दांचे मीट झाले
आग ओकीत तेच
पुन्हा गंगेत न्हाले
काळ्या कितीक रात्री,
वेड मनात भ्याले
शब्द तेच पाठीशी,
अन ढालही तेच झाले
कधी करावेसे काही
कधी सोडून देणे झाले
वेड्या मनाचे असे
बहाणे किती झाले

