शब्द
शब्द


प्रेमाने प्रेम वाढते
शब्दाने शब्द वाढतो
जपून टाका शब्द तुम्ही
निघालेला शब्द
अन सुटलेला बाण
परत येत नसतो
शब्दात मोठी ताकत असते
झाडालाही नाचविण्याची
वाऱ्यालाही हसविण्याची
शब्दात मोठी ताकद असते
चंद्र - सूर्य तोडविणायची
समुद्राला उसळविण्याची
अन पुन्हा शांत करण्याची
शब्दात मोठी ताकद असते || धृ ||
शब्दात तालवारीपरी
ताकद असते
तलवारीने धड
तर शब्दाने मन कापले जाते
शब्दात मोठी ताकद असते
काडीचीही गरज नसते
जंगल सारे पेटविण्यासाठी
शब्दात मोठी ताकद असते || धृ ||
शब्दात मोठी ताकद असते
शब्दाने अंग तापते
शब्दाने डोके पेटते
अन् रक्त सळसळते
शब्दात मोठी ताकद असते || धृ ||