लढा विषाणूशी
लढा विषाणूशी


असे जगावे विषाणू सांगे, लढण्याचे देउनी उत्तर |
प्रतिकार शक्ती शरीर सांगे, स्वजनला देउनी अत्तर |
न विसरता मास्क लावुनी, कधी न पडावे बाहेर |
हात स्वच्छ धोऊंनी, विषाणूला काढून बाहेर |
असता गरज तेंव्हाच, पडावे घराबाहेर परीक्षित,
नसता कधीही उगाच, घरीच राहावे सुरक्षित |
नको हस्तोलनं स्वजनांशी, ठेउनी सामाजिक आंतर |
नको मिठी त्या प्राण्याशी, वाढवोनि मनाचे जंतर |
येता लक्षणे तुम्हा कधी, घेवोनि डॉक्टरांच्या सल्ला |
न सांगता सहन केले, गंभीर झाले, संपेल तुमचा गल्ला |
घ्याव्या हिरव्या भाज्या आहारामध्ये, स्वच्छ करोनि जाल,
असावी फळे खाण्यामध्ये, येईल जशी पाठीशी ढाल |
व्यायाम करावा रोज सकाळी, होईल कणखर शरीर |
ध्यान करावे रोज देवाचे, होईल शांत मान |
कधी न घालावा, वेळ व्यर्थ, करीत राहावे कर्म |
भविष्य काली, लागेल जे, भेटेल तेंव्हा मर्म |
|| सुरक्षित रहा, घरी रहा, खंबीर रहा ||