Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aruna Honagekar

Abstract Others

4.7  

Aruna Honagekar

Abstract Others

जीवन म्हणजे काय असते

जीवन म्हणजे काय असते

1 min
987


जीवन म्हणजे काय असते

गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची

आईशी जोडलेली नाळ असते

कि त्याच बाळाने आईवडिलांना

दिलेले एकाकीपण असते। 


जीवन म्हणजे काय असते

रेल्वे च्या गर्दीत जीव मुठीत

घेऊन उभ रहाणं

कि घामाने डबडबलेल्या

कपडयाइतका मोबदला न मिळणं। 


जीवन म्हणजे काय असते

तुझं माझं प्रेम असतं

प्रेम नसल्यावर आत्महत्या करणं असतं

का एकमेकांशी तडजोड करून

आठवणींचा कप्पा बंद करण्यात असतं। 


जीवन म्हणजे काय असते

कोरोना साऱख्या वायरस ने

जगाला मृत्यू ची दहशत देणं

का अश्या टप्प्या टप्प्यावर

मिळणा-या वायरस शी धीराने लढणं। 


जीवन म्हणजे असते

आशा निराशेची बंदीश

जी बाल्याच्या षड्जापासून झंकार ते

मृत्यू च्या नी पर्यंत

हे जाे जाणतो तोच करताे

जगण्याची फर्माईश । 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract