STORYMIRROR

Piyush Lad

Tragedy Others

3  

Piyush Lad

Tragedy Others

जीवन एक रंगमंच..!

जीवन एक रंगमंच..!

1 min
533

आयुष्याच्या दानाचे देवा आभार आहे 

पण रंगाच्या मंचावर जीवनाचा भार आहे


भूमिकांचा भार झाला मजसी मी शोधत आहे

अंतरीचे भाव हरवले सौख्यासी मागत आहे


नाट्याचा मंच नसे हा जीवनाचा सार आहे

मंचचा बाह्य कुठला मृत्यूचे द्वार आहे


नाट्याचे कौतुक नुसते जणू गोडी फार आहे

नात्यांची धार आणिक पाठीवर वार आहे


मंचाचा देखावा पण रसिकांची जात आहे

शरीराची साथ जरी पण हृदयाचा घात आहे


निःशब्द आताच झालो परी नाटक शेष आहे

आत्म्यास नटविले मी अन शरीराचा वेष आहे....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy