STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Romance

4  

Dilip Yashwant Jane

Romance

झुल

झुल

1 min
584

कान काळजाचे केले

शब्द सारे वेचण्यास

भावबंध मनातला

हृदय पुरे जाणण्यास


भाव गुंफला मनात

शब्द सारेच वेचून

अर्थ जीवनास आला

झुल नवी पांघरून


बदललो अंतर्बाह्य

खुजेपण रे सोडले

संगतीनं तुझ्या सवे

नाते शब्दांशी जडले


दृष्टी लाभली नविन

गातो आनंदाने गाणे

सृष्टी पाहे नवलाई

माझे वेगळे जगणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance