STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Action Inspirational

4  

Mita Nanwatkar

Abstract Action Inspirational

जगायचंय मला

जगायचंय मला

1 min
1.5K

मनात येईल तसं बेभान

एकदा वागायचंय मला

झिडकारून सारी बंधने

स्वैरपणे उडायचंय मला

खूप दाखवलं सामंजस्य

थोडं वेडं व्हायचंय मला

गमावलं तरी काय नेमकं

हे जाणून घ्यायचंय मला

पाप,पुण्य,चांगले, वाईट

सारंच विसरायचंय मला

निद्रिस्त, मृत भावनांना

पुन्हा जागवायचंय मला

जीवघेणं वास्तव आता

मागेच सोडायचंय मला

कल्पक स्वप्न रंजनातच

गाढ  झोपायचंय  मला

कधी येतच नसतो उद्या

आजच जगायचंय मला

रोमांचक ,मधूर क्षणांना

मुक्त अनुभवायचंय मला

हे नाही ते नाही म्हणूनी

नाहीच रडायचंय मला

जे आहे ओंजळीत तेच

सहर्ष  जपायचंय मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract