STORYMIRROR

vaishali vartak

Classics Inspirational Others

4  

vaishali vartak

Classics Inspirational Others

जगाव थोड स्वतःसाठी

जगाव थोड स्वतःसाठी

1 min
368

सुख शांती अन् आनंद 

मिळवण्या धावे मानव जन्मभर

तरी जगावं थोड स्वतः साठी

शौशोधावा जीवनी निवांत पळभर


बालपण गेले बागडण्यात 

नव्हती कशाचीच चिंता ऊरी

पण येता समज झाले मोठे

जवाबदारीच आली खांद्यावरी


पेलता सावरिता कौटुंबिक ओझे

मिळाला नाही निवांताचा वेळ

तरी जगाव आता थोडे स्वतः साठी

मस्त जमवित जीवनी मेळ


पहा पशु पक्षीशोधती क्षण

मजेत टिपती विहराती नभात

कसे जगती मोदाने स्वताःतात

रवंथ करिती पहा गुरे निवांतात


शमवूनी आपुल्या तप् किरणांना

रवी जातसे अस्तचलाला

जगतो थोडे तोपण स्वतःसाठी

जातो अवनीच्या कुशीत निजायाला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics