STORYMIRROR

anand baraskar

Tragedy

3  

anand baraskar

Tragedy

जेंव्हा पैसे नसायचे .......

जेंव्हा पैसे नसायचे .......

1 min
705


जेव्हा पैसे नसायचे ......

तेंव्हा खूप वेगळे दिवस असायचे 

कित्येक जणांचे खिसे रिकामे असायचे,

पण एकमेकांच्या सुख - दुःखात

मन भरून वावरायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

तेव्हा माणसं रस्त्याने चालत असायचे,

ना रिक्षा ना मोटरसायकल

माणसाचे पायचं वाहन असायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

तेव्हा फॅशनबल कपडे नसायचे,

साधे कपडे अन राहणीमान

अंगाने बलवान अन पैलवान

यातच एक नंबर दिसायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

रिकाम्या हातीच माणसं खूप काही शिकायचे,

मैदानात कसरत तर

ज्ञान झाडाखाली मिळवायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

आई बाप अन भ्राता

या सगळ्यांसोबत वैर नसायचे

उशीर कितीही झाला तरी एकत्रच जेवत बसायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

तेव्हा सायकल वर शाळेत

अन चालत शेतात जात असायचे,

पण कधीच कुणाचे पाय दुखत नसायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

तेव्हा एक टाइम कण्या 

अन दोन टाइम भाकर मिरची खात असायचे,

तरी कधीच कुणाला जुलाब होत नसायचे.


जेव्हा पैसे नसायचे .......

तेव्हा निसर्गात शुद्ध हवा

अन शुध्द पाणी फ्री मध्ये असायचे,

आज एवढा पैसे अन तंत्रज्ञान असून सुद्धा

यातलं कुठलंच दिसत न्हाय

orignal तर लांबच गेलं

duplicate सुद्धा जाहिरात बाजी

करून विकत हाय .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy