जातीअंत
जातीअंत
जात म्हणता म्हणता
किती होशील दिशाहीन
माणसात शोध माणूस
माणसाची पडली वाण
जात म्हणता म्हणता
किती सांडशील रक्त
सगळे एका भाकरीसाठी
झाले दिशाहिन फक्त
जात म्हणता म्हणता
माणुसकीचा खून होतो
लहानमोठ्या भ्रमापायी
माणसाचा जीव जातो
जात म्हणता म्हणता
किती करतोस वाटणी
लाल, निळा, हिरवा माझा
करुनी माणसाची छाटणी
जात म्हणता म्हणता
झाले दीनदुबळ्याचे हाल
सत्तेला नसती जात
ते करतात जातीचे भांडवल
जात म्हणता म्हणता
रोज घडवितात जाळपोळी
दंगल कत्तली घडवून
निखाऱ्यावर त्यांचीच पोळी
जात म्हणता म्हणता
पोट भराया लागते भाकर
काबाड कष्ट करुन फार
माणुस जातीसाठीच बेजार
जात म्हणता म्हणता
ती कधी निघून जाईल
जातीअंत होईल कधी
कधी जातील बेड्या गळुन
जात म्हणता म्हणता
तेवत ठेवा माणवतेची मशाल
मिटवु दे जातीजातीचा अंधार
स्नेहबंध मानवतेशी कर खुशाल
जात म्हणता म्हणता
टोळके करतात घातपात
खेळखेळती सत्ता जातीचा
लाल रक्ताची एक जात
जात म्हणता म्हणता
तुझ्या सवे जाईल विरुन
कर्तृत्वाने उजळ दाही दिशा
जातीवंत उतरंडी जातील गळून
