STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance

4  

Sagar Jitendra Bangar

Romance

जाता जाता एक साद देऊन जा

जाता जाता एक साद देऊन जा

1 min
1.5K

देवूनी मज सारे अश्रू तुझे 

माझे सारे सुख घेऊन जा..

मनातल्या आठवणींना तू सख्या

जाता जाता एक साद देऊन जा.. 


नको होते रुसवे फुगवे मज

मी डोळ्यांतच आनंदी तुझ्या..

पापण्यांत साठलेल्या पाण्याला

जाता जाता थोडा वेळ बघून जा..


निरंकार प्रेम याच जागी झाले

पण तुझा इरादाच वेगळा होता.. 

दुखनार्‍या माझ्या हृदयाला 

जाता जाता कधी फुंकर मारून जा..


अजुनही मन वेडेच आहे

शब्द जूने तुझे ऐकण्यासाठी..

तिरस्कार नको मला तुझा फक्त

जाता जाता प्रेमाचे शब्द बोलून जा..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance