STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

जागतिकीकरण

जागतिकीकरण

1 min
321

जागतिकीकरण झाले

झाली मुक्त अर्थव्यवस्था.

जग झाले मोकळे.

 आले नवनवीन तंत्रज्ञान 

 आले गुगल मोबाईल इंटरनेट.

दुर्लभ झाली माणसाची भेट.

 आहे पैसा श्रीमंती बंगला गाडी.

 माणसातली माणुसकी आटलीय थोडी.

पैसा कमवण्याच्या नादात.

हरवलय बालकांचे बालपण.

पैसा वाटू लागला आहे मोठा.

मुलगाही परदेशात जाऊन कमवतोय पैसा.

 मायबापाकडे बघायला वेळ नाही.

आहेत वृध्दाश्रमात मायबाप .

मरणानंतरही विसरत आहे 

मायबापाला पोटचा गोळा.

 म्हणतोय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 

दाखवा मला सोहळा.

तंत्रज्ञानाने घोटलाय माणुसकीचा गळा.

हा नाश थांबवा थांवबा म्हणून

भूभातेचे तनमन जळते आहे.

जागतिकीकरणाच्या विळख्यात

प्रदूषणाने भूमातेला छळले आहे.

नद्या तलाव झाले कोरडे.

पर्वतांनाही पडलय कोडे

वृ्क्ष वनराई झाली नष्ट

रवी ,चंद्र ,वरूणराजाही

होतोय आता रूष्ट.

बळीराजाची होते जीवाची घालमेल.

दुष्काळात होरपळत सोसत आहे कष्ट.

ओझोनचा थर झालाय नष्ट.

पशू प्राणी पक्षीही दिसत नाही कोठे.

सगळीकडे सिंमेंटची जंगले दिसतात.

हा नाश थांबवा हा नाश थांबवा.

म्हणत भूमातेचे तनमन आहे जळते आहे.

भूमाता माणूसकीच्या शोधात फिरत आहे.

सारे जग अडकलेले

जागतिकीकरणाच्या विळख्यात.


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational