STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

इच्छा

इच्छा

1 min
245

नजरेतला भाव तिच्या मी

आज जरा फोटोत निरखून पाहिला

माझ्या पहिल्या प्रेमाचा स्वभाव

हृदयात घर करून राहिला....

कालही जशी होतीस 

आजही तशीच आहेस

उद्याही तशीच राहणार

सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावरचं 

तसच मनमोहक राहणार

झालेल्या गप्पा जरी कमी असल्या

तरी आयुष्यभर आठवणीत राहतील

एवढ्यातरी पुरेश्या आहेत

तुझ्या प्रत्येक शब्दांचे बोल

माझ्या कानी नेहमी ऐकू येतील

एवढ्यातरी रोज हव्याश्या आहेत

नाही कोणतीच फिरण्याची आठवण

तुझ्याबरोबरची माझ्या जवळ

तरीही सोबत राहील माझा सहवास

एवढा राहिलो मी तुझ्या मनाजवळ

आयुष्याच्या या वळणावर

पुन्हा कधी तरी भेट होईल

एवढीच अपेक्षा मी नेहमी

तुझा फोटो बघून व्यक्त करतो

रंगतील पुन्हा गप्पा 

जुण्या आठवणीत घडलेल्या घटनांच्या

सुगंधी फुलेही या बागेत बहरतील

रंगीबेरंगी फुलपाखरेही अवतीभोवती जमतील

हा क्षण पुन्हा पुन्हा आयुष्यात येवो

एवढीच माझी इच्छा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance