Sanjay Gurav

Romance


3  

Sanjay Gurav

Romance


हवे कशाला नाव?

हवे कशाला नाव?

1 min 192 1 min 192

सांग कशाला हवे

तुझ्या माझ्या नात्याला नाव?

विश्वासाच्या पत्त्यावरचं

आपलंच गजबजलेलं हे गाव


सांग करता येईल का

तुझ्या माझ्या नात्याचा नेमका भाव?

तराजूच नाही असा

ज्याचा लागेल इथे पुरता निभाव


सांग इवलासा तरी

संशयाला आहे का नात्यात वाव?

हवे तेथे सैर करावी

बुडणारच नाही अशी ही स्वर्गीय नाव


सोडू चिंता जगाची

वरलिया रंगाचा इथे फसवाच डाव

दोन जीवांचा मामला

फक्त अंतरीचे भाव... हवे कशाला नाव?


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjay Gurav

Similar marathi poem from Romance